कोईंबतूर (तामिळनाडू) - पेरीयानइकेंपलयम शहराजवळील जंगलामध्ये एका हत्तीचा मृतदेह आढळला आहे. केरळमधील हत्तिणीच्या मृत्यूप्रमाणेच या ही हत्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोईंबतूर परिसरात गेल्या तीन महिन्यांमध्ये 8 हत्तींची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
तमिळनाडूच्या कोईंबतूर परिसरात गेल्या तीन महिन्यात 8 हत्तींची तस्करी झाल्याचे उघड - Pineapple firecracker
पेरीयानइकेंपलयम शहराजवळील जंगलामध्ये एका हत्तीचा मृतदेह आढळला आहे. केरळमधील हत्तिणीच्या मृत्यूप्रमाणेच या ही हत्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
केरळच्या हत्ती अभ्यासकांचे निरीक्षण -
केरळचे हत्ती अभ्यासक आणि आशियन एलिफंट स्पेशालिस्ट गृपचे सदस्य पी. एस. एसा यांच्या माहितीनुसार, त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीमध्ये अशाप्रकारच्या पाच वेळा घटना घडल्या असून, मी त्या हत्तींना जवळून पाहिलं आहे. तसेच ते म्हणाले, दोन शक्यता असण्याची शक्यत आहे. पहिले म्हणजे जंगला शेजारी शेती करणारे शेतकरी आपल्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून, शेताभोवती इलेक्ट्रीक करंट सोडतात. त्यामुळे वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो तर काहीवेळा त्यांची शिकार केली जाते.