श्रीनगर -भारत-पाकिस्तान सीमेवरील सांबा जिल्ह्यातून 150 मीटर लांबीचा बोगदा असल्याचे बीएसफला आढळले आहे. या बोगद्यातूनच चार दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली असावी, अशी शंका जम्मू-कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीच्या तपासादरम्यान या राष्ट्रीय महामार्गावरील नगरोटाजवळ हा बोगदा आढळला, असेही ते म्हणाले.
चार दहशतवाद्यांची बोगद्यामार्गे घुसखोरी
गुरुवारी पहाटे पाच वाजता जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान टोलनाक्यावर दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले होते. यात जैशचे चार दहशतवादी मारले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून 11 एके अॅसाल्ट रायफल, तीन पिस्तुल, 29 ग्रेनेड आणि सहा यूबीजीएल ग्रेनेड्ससह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये शिरण्यासाठी या बोगद्याचा वापर केला असल्याचा संशय आहे
मोठा शस्त्रसाठा जप्त