हैदराबाद-देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनही 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठिकठिकाणची धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर तिरुमाला तिरुपती देवस्थानने अर्जित सेवा 31 मेपर्यंत रद्द करण्यात आली असल्याचे घोषित केले आहे.
'अर्जित सेवा' 31 मेपर्यंत स्थगित, तिरुपती संस्थानचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
स्पेशल एन्ट्रीचे 300 रुपयांचे तिकीट, दर्शनाचे तिकीट, अर्जित सेवा सेवा तिकीट आणि राहण्यासाठीचे तिकीट रद्द करण्याचा पर्यायही देवस्थानने दिला आहे. या ऑनलाईन तिकीटांचे पैसे भाविकांना परत केले जाणार आहेत.
स्पेशल एन्ट्रीचे 300 रुपयांचे तिकीट, दर्शनाचे तिकीट, अर्जिता सेवा तिकीट आणि राहण्यासाठीचे तिकीट रद्द करण्याचा पर्यायही देवस्थानने दिला आहे. या ऑनलाईन तिकीटांचे पैसे भाविकांना परत केले जाणार आहेत.
देवस्थानने भक्तांना त्यांचे बँक अकाऊंट नंबर, तिकीटाबद्दलची माहिती आणि आयएफएससी कोड देवस्थानच्या helpdesk@tirumala.org. या ईमेल आयडीवर पाठवण्यास सांगितले आहे. या संपूर्ण बाबींची तपासणी केल्यानंतर भाविकांच्या अकाऊंटमध्ये त्यांचे पैसे परत केले जाणार असल्याचे देवस्थानने म्हटले आहे.