नवी दिल्ली -अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्तानचे अध्यक्षांना धमकी पुर्ण पत्र लिहले आहे. त्यांनी लिहलेल्या औपचारीक पत्रातील भाषेवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
'चला एक चांगला करार करू 'हजारो लोकांच्या कत्तलीसाठी तुम्ही जबाबदार होऊ इच्छित नाही आणि मला तुर्कीची अर्थव्यवस्था नष्ट करण्यास जबाबदार व्हायचे नाही. तुमचे काही प्रश्न सोडवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यावर पाणी फिरवू नका. यावेळी आपण एक चांगला व्यवहार करू शकता. जनरल मजलूम आपल्याबरोबर वाटाघाटी करण्यास आणि सवलती देण्यासही तयार आहेत', असे त्यांनी पत्राच्या पहिल्या परिच्छेदात म्हटले आहे.