नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संकटाचा सामना कसा करायचा यासंबधी फोनवर चर्चा केली. कोरोना विरोधातील लढाई लढण्यात भारत आणि अमेरिकेचे संबध पूर्ण शक्तीनिशी कामी आणण्यावर दोन्ही देशांचे एकमत आहे, असे मोदी म्हणाले. ट्रम्प यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मोदींनी ट्विटरद्वारे दिली.
कोरोना संकटावरून मोदी-ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा
अमेरिकेत 2 लाख 70 हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 7 हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. कोरोना संकटाचा सामना कसा करायचा यावर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. औषधांच्या पुरवठ्याबरोबरच तंत्रज्ञानाचा अभिनव पद्धतीने कसा वापर करता येईल, यासंबंधी चर्चा झाली.
अमेरिकेत 2 लाख 70 हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 7 हजारापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरात 1 लाख कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत.