महाराष्ट्र

maharashtra

डोनाल्ड ट्रम्प यांचे हवेतील व्हाईट हाऊस आणि बीस्ट कार, ही आहेत वैशिष्ट्ये

By

Published : Feb 23, 2020, 3:06 PM IST

Updated : Feb 23, 2020, 3:34 PM IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था अंत्यत उच्चदर्जाची असते. राष्ट्राध्यक्षांना प्रवासासाठी असलेले विमान आणि कार ही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलीयं. पहा जगातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा व्यवस्था कशी आहे.

trump india visit
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

हैदराबाद - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प यांच्यासोबत २४ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प भारत दौऱ्यावर आपल्या एअर फोर्स वन या विमानाने येणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे हवेतील व्हाईट हाऊस आणि बीस्ट कार, ही आहेत वैशिष्ट्ये

भारतात आल्यानंतर आपल्या लिमोजीन 'बीस्ट' या कारमधून ते थेट मोटेरा स्टेडियमवर पोहोचणार आहेत. बीस्ट कार बनवण्यासाठी १५ लाख अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे.

कसं आहे एयर फोर्स वन विमान ?

  • अमेरिकेचे अध्यक्ष 'एअर फोर्स वन' या विमानाने प्रवास करतात. या विमानाला 'हवेतील व्हाईट हाऊस' असेही म्हणतात.
  • या विमानामध्ये हवेत इंधन भरण्याची सोय आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटीक पल्स हल्ल्याचा विमानावर काहीही परिणाम होत नाही. एअर फोर्स वन विमानाला अमेरिकेच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे.
    असे आहे एअर फोर्स वन विमान
  • हे विमान अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असून अमेरिकेवर हल्ला झाला तर विमानाचा वापर मोबाईल कमांड सेंटर म्हणूनही करता येऊ शकतो.
  • विमान तीन मजली असून एकून क्षेत्रफळ ४ हजार स्केअर फूट आहे. एक मोठे कार्यालय, मिटींग रुम तसेच अध्यक्षांसोबत राहणाऱ्या व्यक्तींसाठी खोल्या आहेत.
  • व्हाईट हाऊस लष्करी कार्यालयातील एअरलिफ्ट ग्रुप हा विभाग एअर फोर्स वन विमानाची जबाबदारी आहे.

कोणताही हल्ला परतावून लावणारी बीस्ट कार ?

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी बीस्ट ही कार २४ सप्टेंबर २०१८ पासून वापरण्यात येत आहे. याआधी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कैडलिक वन ही गाडी होती.
  • या कारमध्ये अनेक सुरक्षा संबंधी उपकरणे बसवण्यात आली आहेत. जसे की पंप एक्शन शॉटगन, अश्रूधुर ग्रेनेड लाँन्चर, स्मोक स्क्रीन डिस्पेंसर आणि अध्यक्षांना सुरक्षित ठेवण्यासाठी अग्नीविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे.
  • याशिवाय कारला बुलेट प्रूफ खिडक्या आणि दरवाजे, बॉम्ब विरोधी आवरण, पंक्चर विरोधी टायर आणि सॅटेलाईट फोनची सोय आहे.
    अशी आहे बीस्ट कार
  • बीस्ट कारची बॉडी स्टील, अॅल्युमिनियम, टाईटेनियम आणि सिरॅमिक पासून बनवण्यात आली आहे.
  • कारच्या आतमध्ये बसलेल्या व्यक्तीवर केमिकल हल्ल्याचाही काही परिणाम होऊ शकत नाही.
  • याशिवाय गाडीत राष्ट्राध्यक्षांच्या ब्लडग्रूपचे रक्त, पैनिक बटन, ऑक्सिजन आणि नाईट व्हिजन कॅमेरे ठेवण्यात आले आहेत
  • गाडीच्या आत ड्रायव्हर आणि मागे बलसेल्या व्यक्तीमध्ये एक काच आहे, या काचेवर फक्त अध्यक्षांचे नियंत्रण असते.
  • बीस्ट कारच्या ड्राईव्हरला आणीबाणीच्या परिस्थितीचा मुकाबला कसा करायचा? याचही प्रशिक्षण दिलेले असते.
Last Updated : Feb 23, 2020, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details