जयपूर- लॉकडाऊनमुळे रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकची चाके थांबली आहेत. राजस्थानमध्ये लाखो ट्रक सामान वाहून नेण्यासाठी वापरले जातात. परंतु लॉकडाऊनमुळे आता यातील फक्त 30 टक्के वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे ट्रकमालक आणि ट्रकचालक आणि मोठ्या ट्रॉली तसेच पिकअप चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबरोबर वाहनांशी निगडीत असणाऱ्या लोकांनाही उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
- राजस्थानमधील ट्रकची संख्या -
- सुमारे 4 लाख 87 हजार ट्रक नोंदणीकृत
- 30 टक्के ट्रक आवश्यक सेवांमध्ये व्यस्त
- राजस्थानमध्ये मोठ्या ट्रॉलीची संख्या -
- राज्यात सुमारे 1 लाख 77 हजार मोठ्या ट्रॉलीची नोंदणी आहे.
- तर आता फक्त 15 टक्के ट्रॉली प्रवासासाठी वापरण्यात येत आहेत.
- राजस्थानमधील पिकअपची संख्या -
- राज्यात सुमारे 2 लाख 40 हजार पिकअप आहेत.
- त्यापैकी 30 टक्के पिकअप सुरु आहेत.