आझमगड - जिल्ह्यातील सिधारी ठाणे क्षेत्रातील टिल्लू गंज बाजारात झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. आझमगड जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
आझमगडमध्ये ट्रकने चिरडल्याने ६ जणांचा मृत्यू तर, ६ जण गंभीर जखमी - uttarpradesh
चक्रपानपूर रस्त्यावर अनियंत्रित ट्रकने २ मोटारसायकलस्वारांना चिरडले. यानंतर, अनियंत्रित ट्रकने टिल्लू गंज बाजारात प्रवेश करताना अनेक दुकानांना उडवले.
काल (शनिवार) रात्री गाजीपूर मारच्या बाजूला चक्रपानपूर रस्त्यावर अनियंत्रित ट्रकने २ मोटारसायकलस्वारांना चिरडले. यानंतर, अनियंत्रित ट्रकने टिल्लू गंज बाजारात प्रवेश करताना अनेक दुकानांना उडवले. ट्रकची धडक इतकी जोरदार होती, की दुकानांच्या बाजुला असलेल्या गाड्यांचा चक्काचूर झाला. या घटनेत दारा (वय १३), रीनादेवी (वय ३२), सोहनी (वय ४ महिने), राम सुरत चौहान (वय ६०), बुलबुल (वय ५) आणि एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पूर्ण बाजारात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्ता बंद करताना निदर्शने करण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेताना निदर्शने करणाऱ्या नागरिकांची समजूत घालताना त्यांना शांत केले.