महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्यातील प्रचार सभेत पंतप्रधान पर्रीकर यांचेच नाव का उच्चारत होते, काँग्रेसचे पुन्हा मोदींवर टीकास्त्र

राफेल फाईल चोरीचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे बुधवारच्या (१० फेब्रुवारी) गोव्यातील प्रचार सभेत ते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उदोउदो करत होते, असा आरोप काँग्रेसच्यावतीने आज गुरुवार (११ एप्रिल) पत्रकार परिषदेत करण्यात आला.

गोव्यातील प्रचार सभेत पंतप्रधान पर्रीकर यांचेच नाव का उच्चारत होते, काँग्रेसचे पुन्हा मोदींवर टीकास्त्र

By

Published : Apr 11, 2019, 11:11 PM IST

पणजी -राफेल फाईल चोरीचे भूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसल्यामुळे बुधवारच्या (१० फेब्रुवारी) गोव्यातील प्रचार सभेत ते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा उदोउदो करत होते. तसेच या फाईलमुळेच पणजी पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी पर्रीकर यांच्या मुलांना देण्याची चर्चा आहे, असा आरोप काँग्रेसच्यावतीने आज गुरुवार (११ एप्रिल) पत्रकार परिषदेत करण्यात आला.

येथील काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपतर्फे आयोजित प्रचारसभेत मोदींनी गोमंतकियांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्याऐवजी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी काय केले, यावरंच भाषण केले. आपल्या भाषणात पर्रीकर यांचे नाव २० वेळा तरी घेतले. मात्र, ज्यांची प्रचारसभा होती आणि जे त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, त्या श्रीपाद नाईक यांच्या नावाचा उच्चार देखील केला नाही.

मुख्यमंत्र्यांचा नावाचाही एकदाच उल्लेख केला. याला कारण पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये असलेल्या राफेलच्या फाईल असाव्यात. कारण, भाजपच्याच एका मंत्र्याची एक ऑडिओ टेप प्रसिद्ध झाली होती. यात पर्रीकरांनी त्यांच्या बेडरुममध्ये राफेलच्या फाईल असल्याचे या नेत्याला सांगितले होते. अशा संदर्भाची तो ऑडिओ टेप होता. मात्र, आरोग्य मंत्री राणे यांनी सदर ऑडिओ बनावट असून चौकशीची मागणी केली होती. तर, पर्रीकरांनीदेखील हे आरोप फेटाळले होते. जे स्वतः च्या घरातील चोरी थांबवू शकत नाहीत, ते कसले चौकिदार, असा सवालही डिमेलो यांनी यावेळी उपस्थित केला.

गोव्यातील प्रचार सभेत पंतप्रधान पर्रीकर यांचेच नाव का उच्चारत होते, काँग्रेसचे पुन्हा मोदींवर टीकास्त्र
नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आदी सरकारी धोरणावर न बोलता किंवा काय करणार, हे सांगण्याऐवजी पर्रीकर यांच्यावरच पंतप्रधान बोलले. बोफोर्स प्रकरणावर बोलले मात्र, राफेलवर काहीच बोलले नाहीत, अशीही टीका यावेळी डिमोलो यांनी मोदींवर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details