चंदीगढ - शहरातील मनीमाजरा येथील मॉडर्न कॉम्प्लेक्समधील एका घरात बुधवारी रात्री दोनच्या सुमारास तिघांची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. आरोपी तिघांची हत्या करून घराला कुलूप लावून फरार झाला. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घराचे कुलूप तोडून तीन मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
चंदीगडमधील मनीमाजरा येथे तिहेरी हत्याकांड - Chandigarh Police News
चंदीगड शहरातील मनीमाजरा येथील मॉडर्न कॉम्प्लेक्समधील एका घरात बुधवारी रात्री तिघांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री दोनच्या सुमारास पोलिसांना मनीमाजरा येथील मॉडर्न कॉम्प्लेक्समधील घरात तीन लोकांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. यानंतर मनीमाजरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरामध्ये ४५ वर्षीय सरिता, मुलगा अर्जुन (१६), मुलगी सेंसी (२२) यांचे मृतदेह पडले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.
एसएसपी नीलांबरी जगदाळे यांनी हत्याकांड झाल्याची माहिती दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. संजय अरोडा या भाड्याच्या घारात एक वर्षांपूर्वी रहायला आल्याचेही त्यांनी सांगितले.