महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची ७५ वी जयंती, सोनियांसह राहुल गांधींचे अभिवादन

या व्हिडिओसह राहुल यांनी 'भारतात औद्योगिक क्रांती होऊ शकली नाही. मात्र, कॉम्प्युटर क्रांती न करणे हे भारताला परवडणारे नाही,' असे म्हटले आहे.

राजीव गांधी

By

Published : Aug 20, 2019, 8:26 AM IST

नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची आज ७५ वी जयंती आहे. त्यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला झाला. आज सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंजप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी राजीव गांधींच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत राजीव यांना आदरांजली वाहिली. माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनीही समाधीस्थळी राजीव गांधींना अभिवादन केले.

राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे आठवडाभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्व कार्यकर्त्यांना याविषयी सूचना दिल्या आहेत. तसेच, राहुल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा संपूर्ण आठवडा आपल्या वडिलांना समर्पित करत असल्याचे सांगितले आहे.

वडिलांच्या कार्याची माहिती देणारा राहुल यांचा पहिला व्हिडिओ -

आपले वडील राजीव यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीत देशाने यशस्वीपणे गाठलेल्या विविध टप्प्यांविषयी माहिती देणारे व्हिडिओ पोस्ट करणार असल्याचे राहुल यांनी ट्विटरवरून सांगितले आहे. काल त्यांनी पहिला व्हिडिओ पोस्ट केला. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीविषयी सांगणारा हा व्हिडिओ आहे.

या ५५ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये 'कॉम्प्युटर्स महत्त्वाकांक्षी भारतीयांचे प्रतीक बनले आहेत. यात एन. आर. नारायण मूर्ती, शिव नदार, अझीम प्रेमजी यांच्यासह विविध उद्योजकांच्या जागतिक दर्जाच्या आयटी कंपन्यांचा समावेश आहे. एमटीएनएलद्वारे बारतीय जगभरातील २४३ देशांशी जोडले गेले. डिजिटाईज्ड टेलिफोन एक्सचेंजेस, ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारे पीसीओ, भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच डिजिटल आरक्षण तिकिटे उपलब्ध झाली आदींचा समावेश आहे.'

या व्हिडिओसह राहुल यांनी 'भारतात औद्योगिक क्रांती होऊ शकली नाही. मात्र, कॉम्प्युटर क्रांती न करणे हे भारताला परवडणारे नाही,' असे म्हटले आहे.

काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजीव गांधींच्या संकल्पनांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details