महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बालविवाहांविरोधात लढणारी झुलिमा..! - यूएन पारितोषिक

झुलिमा माल्लिक, कांडा आदिवासी जमातीतील एका गरीब कुटुंबातून आलेली मुलगी. ओडिशाच्या बांधुडी क्षेत्रातील ती रहिवासी आहे. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरुद्ध लढा देताना तिने केलेल्या संघर्षामुळे तिला युनिसेफचे पारितोषिक मिळाले आहे.

Tribal girl odisha wins UN award, Jhulima Mallick
बालविवाहांविरूद्ध लढणारी झुलिमा!

By

Published : Dec 13, 2019, 7:09 PM IST

झुलिमा माल्लिक, कांडा आदिवासी जमातीतील एका गरीब कुटुंबातून आलेली मुलगी. ओडिशाच्या बांधुडी क्षेत्रातील ती रहिवासी आहे. अवघ्या २२ वर्षाच्या या मुलीला 'युनिसेफ'तर्फे देण्यात येणारे 'व्ही-पारितोषिक' मिळाले आहे. संपूर्ण देशभरातून केवळ दहा जणांना हे पारितोषिक देण्यात आले. त्यात ओडिशामधून झुलिमाची निवड करण्यात आली. दिल्लीमध्ये असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयामध्ये, केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडामंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिल्लीमधील पारितोषिक वितरण सोहळ्यातील झुलिमाचे भाषण

आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून शिक्षण सोडून झुलिमा मजूरी करत असे. या दरम्यान, तिने एका स्वयंसेवी संस्थेमध्ये स्वयंसेविका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतरच्या तिच्या कामगिरीमुळेच तिला हे पारितोषिक मिळाले आहे. आपल्या समाजातील बालविवाहासारख्या कुप्रथेविरोधात तिने लढा दिला. तिनेआत्तापर्यंत त्यांच्या समाजातील तब्बल १२ बालविवाह थांबवले आहेत. आता ती याविरोधात आणखी जोमाने काम करत असून त्यांच्या भागात मुलींच्या शिक्षणाविषयी देखील प्रसार करत आहे.

यादरम्यान खुल्या शिक्षण व्यवस्थेच्या मदतीने तिने आपले आणि आपल्या मैत्रिणींचे देखील शिक्षण पुन्हा सुरू केले. यासोबतच इतर मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यावरही ती स्वतः पुढाकार घेऊन भर देत आहे. आपल्या जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील आदिवासी घरातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच बालविवाहांना आळा घालण्यासाठी झुलिमा सध्या काम करते. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेविरूद्ध लढा देताना तिने केलेल्या संघर्षामुळे तिला युनिसेफचे पारितोषिक मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details