नवी दिल्ली :शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यायी इंधनांसाठी नियमावली जारी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.
"नीट सीएनजी गॅसच्या तुलनेत एच-सीएनजी गॅसची इंधन म्हणून चाचणी केल्यानंतर, भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) इंधन म्हणून हायड्रोजन इनरिच्ड कॉम्प्रेस्ड नॅचुरल गॅसचा (एच-सीएनजी) इंधन म्हणून वापर करण्यास परवानगी दिली आहे. नीट सीएनजीच्या तुलनेत हा गॅस कमी प्रमाणात उत्सर्जन करतो असे चाचणीमध्ये समोर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री गडकरींनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.