पाटणा :येथील मोनिका दास यांची येत्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या त्या देशातील पहिल्याच तृतीयपंथी आहेत.
दास या कॅनरा बँकेतील अधिकारी आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून त्या मतदानाचे आणि देखरेखीचे काम पाहतील. त्यांना ८ ऑक्टोबरला या कामाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यापूर्वी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांसाठी रिया सरकार या तृतीयपंथी शिक्षिकेची मतदान अधिकारी म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, पीठासीन अधिकारी म्हणून निवड झालेल्या मोनिका या पहिल्याच तृतीयपंथी आहेत.