नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये मार्च महिन्यात पार पडलेल्या तबलिघी जमात धार्मिक कार्यक्रमाला रोहिंग्या जमातीच्या लोकांनी हजेरी लावली होती, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळाली आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना गृहमंत्रालयाने सतर्क केले आहे.
'तबलिघी धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या रोहिग्यांचा शोध घ्या' - कोरोना बातमी
सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना गृहमंत्रालयाने पत्र पाठविले आहे. ज्या रोहिंग्यांनी तबलिघी जमात कार्यक्रमाला हजेरी लावली आहे, अशांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.
सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना गृहमंत्रालयाने पत्र पाठविले आहे. ज्या रोहिंग्यांनी तबलिघी जमात कार्यक्रमाला हजेरी लावली आहे, अशा व्यक्तींचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे त्यांनाही कोरोना झाल्याची शक्यता आहे. राजधानी दिल्ली, जम्मू काश्मीर, पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये राहणाऱ्या रोहिग्यांची माहिती गृहमंत्रालयाने त्या त्या राज्य सरकारांना दिली आहे, त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
मार्च महिन्यात दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे तबलिघी जमात या संघटनेचा धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाला देशातील अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला परदेशी नागरिकही आले होते, यातील अनेकांना कोरोना असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या कार्यक्रमाला हजेरी लावली असेल तर प्रशासनाला कळवा, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.