नवी दिल्ली -श्रमिक स्पेशल गाड्या रस्ता भरकटल्याची माहिती समोर येत आहे. यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'कोरोना विषाणू महामारीवेळी रेल्वे गाड्यांचा भरकटलले मार्ग ही नरेंद्र मोदी सरकारच्या चांगल्या दिवसांची जादू आहे', असे ते म्हणाले.
'रेल्वे गाड्यांचा रस्ता भरकटणं ही मोदींच्या चांगल्या दिवसांची जादू' - sitaram yechury hits out at modi
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'कोरोना विषाणू महामारीवेळी रेल्वे गाड्यांचा भरकटलले मार्ग ही नरेंद्र मोदी सरकारच्या चांगल्या दिवसांची जादू आहे', असे ते म्हणाले.
मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करते. मोदी सरकार गरिबांची चेष्टा करत असून नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करत आहे. भारतीय रेल्वे बर्याच दशकांपासून कार्यरत आहे. मात्र, आता रेल्वे रस्ता भरकट आहे. ही मोदी सरकारच्या चांगल्या दिवसाची 'जादू' आहे. हे केवळ सरकारचे गैरव्यवस्थाच नाही, तर गरीब विरोधी मानसिकतेचे एक उदाहरण आहे, अशी टीका सीताराम येचुरी यांनी केली आहे.
दरम्यान श्रमिक स्पेशल गाड्या रस्ता भरकटल्याची माहितीवर रेल्वे विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. 22 मे आणि 24 मे रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गांड्याचा मार्ग बदलण्यात आला. कारण, या राज्याकडे जाणाऱ्या मार्गावर 80 टक्के वाहतूक होती.