नवी दिल्ली - भाजप खासदारांचे २ दिवसीय प्रशिक्षणाला आज (शनिवार) सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे खासदारांना प्रशिक्षण देणार आहेत. खासदारांच्या प्रशिक्षणाला 'अभ्यासवर्ग' असे नाव देण्यात आले आहे. संसदेच्या जीमसी ग्रंथालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडणार आहे.
भाजप खासदारांचा 'अभ्यासवर्ग' आजपासून सुरू; सोशल मीडियासह नमो अॅपचे मिळणार प्रशिक्षण - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
खासदारांच्या प्रशिक्षणाला 'अभ्यासवर्ग' असे नाव देण्यात आले आहे. संसदेच्या जीमसी ग्रंथालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडणार आहे.
भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांसाठी प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशिक्षणामध्ये पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रमुख लक्ष देण्यात येणार आहे. तर, खासदारांना यावेळी नमो अॅप आणि सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच नव निर्वाचित खासदारांना संसदेत आणि संसदेबाहेर कसे वागायचे याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवार) प्रशिक्षणाचे अध्यक्षीय भाषण देऊन समारोप करणार आहेत.