छिंदवाडा -मागील पाच वर्षांपासून छिंदवाडा आणि नागपुरमधील सुरू असलेले रेल्वे ब्रॉडगेज लाइनचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर आता छिंदवाडा आणि नागपुरमध्ये रेल्वे सुरू होणार आहे. यामुळे छिंदवाडामध्ये अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकरी आणि प्रवाशांनाही फायदा होणार आहे. युरीया भरलेले मालगाडी ट्रायल स्वरुपात छिंदवाडा येथे पोहोचली. यानंतर सर्व काही ठीक राहिले तर लवकरच प्रवाशी रेल्वेही सुरू करण्यात येणार आहे.
छिंदवाडाहून नागपुरपर्यंत ब्रॉडगेजचे काम चार टप्प्यांमध्ये पूर्ण झाले. यात छिंदवाडापासून भंडारकुंड, इतवारीपासून किलोद आणि किलोदपासून भीमालगोंदी, भीमालगोंदीपासून भंडारकुंड यांचा समावेश आहे. भीमालगोंदी पासून भंडारकुंडपर्यंत बनवण्यात आलेल्या रेल्वे मार्गाला 22 ऑगस्टलाच मंजूरी देण्यात आली होती. यानंतर काही त्रुटी दूर केल्यानंतर 4 महिन्यांपर्यंत मालगाडीच्या प्रवासाला परवानगी देण्यात आली होती. यानंतर आता या मालगाड्या छिंदवाडापासून ते इतवारीपर्यंत धावणार आहेत.
छिंदवाडापासून नागपूरपर्यंत सुरू झालेल्या मोठ्या रेल्वे लाइनचे श्रेय एकीकडे काँग्रेस घेत आहे. तर दुसरीकडे भाजपा याला मोदी सरकारची आणि पक्षाची मेहनतीचा परिणाम, असे सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार नकुलनाथ यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे आभार मानले. तर दुसरीकडे भाजपानेही मोदी सरकारचे आभार मानले.