महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रायपूर: वाहतूक नियंत्रणाचा अनोखा फंडा!

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने हे कंटाळवाने काम मनोरंजक केले आहे. मोहम्मद मोहसिन नावाचा हा कर्मचारी आपल्या नृत्याच्या माध्यमातून वाहतूकीचे नियंत्रण करतो.

वाहतूक नियंत्रणाचा अनोखा फंडा
वाहतूक नियंत्रणाचा अनोखा फंडा

By

Published : Dec 7, 2019, 2:57 PM IST

रायपूर - गर्दीने भरलेल्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागते. वाहतूक नियंत्रण करण्याचे काम कंटाळणवानेही असते. मात्र, छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने हे कंटाळवाणे काम मनोरंजक केले आहे. मोहम्मद मोहसिन नावाचा हा कर्मचारी आपल्या नृत्याच्या माध्यमातून वाहतुकीचे नियंत्रण करतो. मोहसिन यांच्या या कल्पनेमुळे ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांच्याही चेहऱ्यावर हास्य पसरते.

वाहतूक नियंत्रणाचा अनोखा फंडा

हेही वाचा - ...तर या देशाचे नाव जगाच्या नकाशातून मिटेल, उन्नाव पीडितेच्या भावाची उद्विग्न प्रतिक्रिया
रायपूर शहरातील देवेंद्र नगर चौकात मोहसिन वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. चौकातून ये-जा करणारी सर्व वाहनांचे नियंत्रण ते एकटे करतात. काही दिवसांपूर्वी इंदूर येथील रनजीत नावाच्या पोलीसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तोच व्हिडिओ पाहून मोहसिन यांना नृत्य करत वाहतूक नियंत्रित करण्याची कल्पना सुचली. दिवसभर उन्हात नृत्य करत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रचंड उर्जा लागते. त्यामुळे मोहसिन दररोज सकाळी व्यायाम करतात. त्यांना कुठलेही व्यसन नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details