LIVE:
- पंजाब: अमृतसरमध्ये आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या दिला
- सरकारविरोधी कामगार संघटनांचे आंदोलन दिल्लीतही सुरू व्यापारी संघटनांची भारत बंदची हाक
- पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्यात आंदोलकांनी बसची तोडफोड केली. तोंड बांधलेल्या आंदोलकांनी बस थांबवून दगडफेक केली. यावेळी बसमधील प्रवासी जीव मुठीत धरून बाहेर पडले.
- केरळमधील तिरुअंनतरपूरम येथे भारत बंद आंदोलन सुरू आहे. दहा संघटनांनी भारत बंद आंदोलनात घेतला सहभाग
- पंजाब - पटीयालामधील पंजाब विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार आंदोलक विद्यार्थ्यांनी बंद करून प्रदेशद्वारावर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
- बंगाल राज्यात अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू आहे.
- बंगाल (सीलीगुडी)- कामगार विरोधी आंदोलनामुळे बंगालमधील बस सेवा विस्कळीत. बस चालकांना हेल्मेट घालून बस चालवण्याची आली वेळ.
- पश्चिम बंगाल - कंचरपारा, नार्थ २४ परगणा येथे आंदोलकांनी रेल्वे सेवा बंद पाडली.
- पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी हावडा आणि उत्तर परगना भागातील रेल्वे गाड्या अडवल्या आहेत. बस स्थानकावरही बस अडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
- केरळमधील त्रिवेंद्रममध्येही आंदोलकांनी बंदची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून, देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांची संख्या पाहता, आज साधारणपणे 25 कोटी कामगार संपावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.