महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरामध्ये गेल्या 24 तासांत 1 लाख 42 हजार 69 नमुन्यांची चाचणी - latest corona count

देशात आतापर्यंत तब्बल 46 लाख 66 हजार 386 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 42 हजार 69 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) दिली.

कोरोना
कोरोना

By

Published : Jun 7, 2020, 11:00 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना विरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे टाकत भारताने एका दिवसामध्ये तब्बल 1 लाख 42 हजार 69 कोरोना चाचण्या केल्या आहेत.

देशात आतापर्यंत तब्बल 46 लाख 66 हजार 386 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 42 हजार 69 कोरोना चाचण्या घेतल्या आहेत. ही माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) दिली.

जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी फक्त एकच प्रयोगशाळा होती. मात्र, आज संपूर्ण भारतामध्ये एकूण 759 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 531 या शासकीय तर 228 या खासगी प्रयोगशाळा आहेत. तसेच जगाच्या तुलनेत भारताचे मृत्यूचे प्रमाण कमी असून रुग्ण बरे होण्याचा दरही चांगला आहे.

अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 68 लाख 39 हजार 429 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 3 लाख 97 हजार 446 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 33 लाख 31 हजार 959 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details