महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेश: किल्ले, राजवाडे, पर्यटनस्थळी विवाहसोहळा आयोजित करण्यास सरकारची परवानगी - मध्यप्रदेश पर्यटनस्थळे

मध्य प्रदेश सरकार नव्या वर्षाच्या मुहुर्तावर नागरिकांना एक खास भेट देणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्य प्रदेश सरकारने पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमलनाथ, mp govt
कमलनाथ

By

Published : Dec 28, 2019, 12:18 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेश सरकार नव्या वर्षाच्या मुहुर्तावर नागरिकांना एक खास भेट देणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्य प्रदेश सरकारने पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना आता महल, किल्ले, पर्यटन स्थळे येथे लग्नसमारंभ आयोजित करता येणार आहे. २०२० पासून राज्याने या योजनेस मंजूरी दिली आहे.

किल्ले, राजवाडे, पर्यटनस्थळे विवाहसोहळा आयोजित करण्यास खुली
डेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्यप्रदेशातील नागरिकांचा ओढा राजस्थान, गुजरातकडे आहे. मात्र, राज्यामध्ये होणाऱ्या ओरछा महोत्सवापासून राज्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी पर्यटनस्थळे खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील ओरछा, खजुराहो, पंचमढी सह इतर पर्यटनस्थळी विवाहसोहळा करता येणार आहे. अनेकजण विवाहसोहळा संस्मरणीय करण्यासाठी डेस्टिनेशन वेंडीगचा पर्याय निवडतात, त्यांना आता राज्याबाहेर जाण्याची गरज नाही. कमलनाथ सरकारमधील पर्यटन मंत्री सुरेंद्र सिंह बाघेल यांच्या मते या निर्णयामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल आणि राज्याची वेगळी ओळख निर्माण होईल. मात्र, दळणवळण व्यवस्था ही एक समस्या आहे. त्यासाठी सरकार अनेक विमान कंपन्यांशी चर्चा करत आहे, त्यामुळे ही समस्याही लवकरच सोडवली जाईल, असे बाघेल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details