अमरावती- आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यामध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीमध्ये बुडाली. या बोटीमध्ये एकून 72 जण होते. पैकी 50 पर्यटक तर 9 कर्मचारी होते. नदी जवळच्या गावातील लोकांनी २४ जणांना पाण्यातून बाहेर काढले आहे. तर, 11 मृतदेह सापडले. देवीपट्टनम जवळील कच्चूलूरु येथे ही घटना घडली आहे.
आंध्र प्रदेशात 72 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली, मृतांचा आकडा 11 वर
आंध्र प्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्ह्यामध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली.
टोतागुंटा या खेडेगावातील स्थानिकांनी २४ लोकांना वाचवले आहे. तर बचाव पथकाने 16 जणांना वाचवले आहे. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. बोट पर्यंटकांना घेवून गांदीपोचनम मंदिर येथून पापीकोंडालू येथे जात होती, अशी माहिती मिळाली आहे. रॉयल वशिष्टा असे या बोटीचे नाव होते. स्थानिकांनी मदतकार्य हाती घेतले आहे.
हा घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सर्व बोट सेवा तत्काळ स्थगित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.