नवी दिल्ली- गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोनामुळे ३५ लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३०८ वर पोहोचली आहे. तसेच देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्याही ९,१५२ वर पोहोचली आहे.
यामध्ये ७,९८७ रुग्ण अॅक्टिव आहेत. तर आतापर्यंत ८५६ लोकांवरतील यशस्वी उपचार झाले आहेत. देशातील तीन राज्यांमध्ये एक हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक (१,९८५) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (१,१५४) आणि तामिळनाडूचा (१,०४३) क्रमांक लागतो.