नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 8 हजार 380 कोरोनाबाधित आढळले असून 193 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखापेक्षा अधिक झाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 8 हजार 380 कोरोनाबाधित आढळले
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 82 हजार 143 झाला आहे, यात 89 हजार 995 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 86 हजार 984 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 5 हजार 134 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्ली येथे कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशाची एकूण आकडेवारी पाहता भारताने आता चीनला मागे टाकले असल्याचं चित्र आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील टाळेबंदी ३० जूनपर्यंत वाढविली आहे. देशभरात रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. कंटेन्टमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत.