नवी दिल्ली -देशभरामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 हजार 835 झाला आहे. यातील 11 हजार 616 अॅक्टिव्ह केसेस आहेत. 1 हजार 766 जण उपचारानंतर बरे झाले असून 452 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत अद्ययावत माहिती दिली आहे.
दिल्लीत 67 तर राजस्थानात 98 नवे कोरनाग्रस्त; देशभरात 13 हजार 835 बाधित - corona active cases india
दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने 66 ठिकाणे सील करण्यात आली आहेत.
Breaking News
दिल्लीत 67 तर राजस्थानात 98 नवे कोरनाग्रस्त आज दिवसभरात आढळून आले आहेत. दिल्लीत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 707 झाला आहे, तर राजस्थानमध्ये 1 हजार 229 कोरोना बाधितांचा आकडा झाला आहे. दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने 66 ठिकाणे सील करण्यात आली आहेत.
देशातील विविध राज्यातील परिस्थिती
- जम्मू काश्मीरात आज 14 नवे रुग्ण आढळून आले, एकूण कोरोनाग्रस्त 281
- तेलंगाणा 66 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 562
- झारखंडमध्ये 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 32
- गुजरातमध्ये 78 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1 हजार 99
- तामिळनाडूत 56 नवे कोरोनाग्रस्त, एकून रुग्ण 1 हजार 323
- मध्यप्रदेशात 1 हजार 310 कोरोग्रस्त
- आडिशा राज्यात 60 कोरोनाग्रस्त
- हरियाणात 135 कोरोना अॅक्टिव्ह केसेस