महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वरुणराजाच्या रौद्रावताराने ५० जणांचा मृत्यू; तेलंगाणाची केंद्राकडे १,३५० कोटींच्या मदतीची मागणी - Hyderabad rain kills 50

ग्रेटर हैदराबाद महापालिकेला त्वरित मदतकार्य करण्यासाठी तेलंगणा सरकारने ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर पावसाच्या संकटात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतही तेलंगाणा सरकारने जाहीर केली आहे.

तेलंगाणामधील पाऊस
तेलंगाणामधील पाऊस

By

Published : Oct 16, 2020, 2:36 AM IST

हैदराबाद - तेलंगणामध्ये पावसाने केलेल्या हाहाकारात गेल्या काही दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तेलंगणा सरकारचा अंदाज आहे. पावसाने विस्कळित झालेले जनजीवन सध्या पूर्वपदावर येत आहे.

पावसाने मृत झालेल्यांमध्ये हैदराबादमधील ११ जणांचा समावेश आहे. तर ३९ जण राज्यातील इतर भागामधील आहेत. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी त्वरित १ हजार ३५० कोटी रुपयांची मदत करावी, अशी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

हैदराबादमध्ये १९१६ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, असे तेलंगणाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रेटर हैदराबाद महापालिकेला त्वरित मदतकार्य करण्यासाठी तेलंगणा सरकारने ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर पावसाच्या संकटात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतही तेलंगाणा सरकारने जाहीर केली आहे. ज्या व्यक्तींचे घर पावसाने पूर्ण उद्धवस्त झाले असल्यास त्यांना सरकारकडून नवीन घर बांधून देण्यात येणार आहे. तर घराचे नुकसान झाले असल्यास सरकारकडून अंशत: आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हैदराबादमधील ३५ हजार कुटुंबांना फटका बसल्याचे तेलंगणा सरकारने सांगितले. नागरिकांनी तात्पुरती राहण्यासाठी सोय व्हावी, यासाठी सरकारने ७२ निवारागृहे सुरू केली आहेत.

मुसळधार पावसाने ७.३५ लाख एकरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान एकूण २ हजार कोटींचे असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. तेलगंणाजवळ असलेल्या कर्नाटकलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. कर्नाटक राज्यातील बहुंताश धरणांमधून पाण्यासाचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details