- लखनऊ - उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दलित तरुणीवर चौघांनी बलात्कार केला होता. गंभीर जखमाी झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या तरुणीचा शवनिच्छेदनाचा अहवाल आला आहे. तिच्या शरिरावर गंभीर जखमा असून तिला विष देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचेही अहवालात स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वाचा :उत्तरप्रदेश: बलात्कार पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा, विष दिल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट
- नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. आज(शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यास उत्तरप्रदेशला निघाले आहेत. मात्र, दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. सीमेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. हाथरसमधील दलित तरुणीवर गावातील चौघा सवर्ण तरुणांनी बलात्कार केला तसेच तिला गंभीर जखमी केले. या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात या घटनेवरून आंदोलन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि सरकार विरोधक टीका करत आहेत.
सविस्तर वाचा :प्रियंका, राहुल गांधींनी हाथरस पीडित कुटुंबीयांची घेतली भेट, सुमारे एक तास चर्चा
- मुंबई- राज्यात आज (दि. 3 ऑक्टोबर) कोरोना 14 हजार 348 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तर 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 लाख 30 हजार 861 वर पोहचला असून मृतांचा एकुण आकडा 37 हजार 758 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.3 टक्के तर मृत्यूचा दर 2.64 टक्के इतका आहे.
सविस्तर वाचा :राज्यात 14 हजार 348 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांचा एकूण आकडा 14 लाख 30 हजारांवर
- बीड - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे व नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने मेडिकलला नंबर लागणार नाही, अशा आशयाची चिठ्ठी केतुरा येथील तरुणाने लिहून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. मात्र ही व्हायरल झालेली चिठ्ठी बनावट असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी ती चिठ्ठी बनावट असल्याचा खुलासा केला आहे.
सविस्तर वाचा :विवेकची आत्महत्या आरक्षणासाठी नाही; 'ती' चिठ्ठी बनावट असल्याचा पोलिसांकडून खुलासा
- मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेले सहा महिने बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, बार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास ५ ऑक्टोबरपासून राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारने नियमावली व मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
सविस्तर वाचा :५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यासाठी सरकारकडून नियमावली जाहीर
- पाटणा - बिहार विधानसभेचं रणशिंग फुंकण्यात आलंय. तारखा जाहीर झाल्यानंतर कोरोना काळात नेत्यांची जनतेपर्यंत पोहचण्याची धडपड सुरू झालीय. आज बिहार विधानसभा निवडणुकांसाठी महागठबंधनमध्ये जागावाटप झाले असून राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 आणि डावे पक्ष 29 जागांवर लढणार आहेत. यावेळी सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचबरोबर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार असून यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे.