- मुंबई -राज्यात आज (शुक्रवारी) कोरोना विषाणूची लागण झालेल्या १५ हजार ५९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ लाख १६ हजार ५१३वर पोहचला आहे. तर एकूण मृतांची संख्या ३७ हजार ४८० इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के तर मृत्यूचा दर २.६५ टक्के इतका आहे.
सविस्तर वाचा :महाराष्ट्र कोरोना अपडेट : १५ हजार ५९१ नवीन रुग्णांचे निदान, ४२४ रुग्णांचा मृत्यू
- वर्धा -महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश देत सेवाग्राम गावाची वाट धरली. रामराज्याप्रमाणे त्यांनी ग्रामराज्य हा नवीन शब्द आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. गांधीजींना बघण्यासाठी खेड्या पाड्यातील लोक गर्दी करायचे. त्या खेड्या पाड्यातील लोकांना विकास म्हणजे त्याचे आयुष्य सुखा-समाधानाने आनंदाने जगात यावे, म्हणून स्वातंत्र्य पाहिजे होते. यासाठी महात्मा गांधींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेची आज गरज आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजीच्या 151व्या जयंती आणि सप्ताहानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते ऑनलाईन माध्यमातुन बोलत होते.
सविस्तर वाचा : 'महात्मा गांधीजींची ग्राम स्वराज्याची संकल्पना आजची गरज'
लखनऊ- हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रशासनाविरोधात राज्यात आणि संपूर्ण देशात आंदोलन होत आहे. दरम्यान, योगी सरकारने हाथरस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
सविस्तर वाचा :हाथरस सामूहिक बलात्कार: पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन
- ठाणे - 'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ५० लाख रुपये देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी,' अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे काकांनी उल्हासनगरमध्ये दिली आहे. योगी सरकारने पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत जाहीर केली, या आश्वासनावर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा :'५० लाख रुपये देतो मुख्यमंत्री पद सोडा', हाथरस पीडितेच्या काकांचे मुख्यमंत्री योगींना आव्हान
- पुणे -राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी न्यायालयात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर, दहा जणांनी न्यायालयात जावे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आज दिली. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्विट केले होते. त्यांच्या भूमिकेवर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.