- मुंबई - गुरुवारी राज्यात कोरोनाच्या १६ हजार ४७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ लाख ९२२ इतकी झाली आहे. राज्यात आज १६ हजार १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात दिवसभरात १६ हजार ४७६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ३९४ मृत्यू
- मुंबई -कोरोना प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला आहे. त्यात जवळजवळ 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरी हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जात नाही. आता अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असताना आणि पाच महिन्यांचा कालखंड चाचण्या न वाढविण्यात निघून गेला असताना पुन्हा एकदा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; म्हणाले...
- मुंबई -लोकशाहीचे जतन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच लोकशाहीची अशाप्रकारे पायमल्ली करत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
'काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी उत्तरप्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत निंदनीय'
- मुंबई - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र निषेध करत प्रदेश काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. यावेळी मोदी सरकार आणि योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून काँग्रेसच्या नेत्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
योगी सरकारच्या दंडेलशाहीविरोधात काँग्रेसची मंत्रालयाशेजारी जोरदार निदर्शने
- लखनऊ - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पायी चालत जात असताना, त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली आहे.
- नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये बलात्काराचा कोणताही उल्लेख नाहीय. मात्र, अद्याप उत्तर प्रदेश पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले होते. तसेच तिचा गळा दाबण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विक्रांत वीर यांनी अधिक माहिती दिली आहे.