- मुंबई -शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या नसत्या उठाठेवींमुळे मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर आज(बुधवार) सर्वोच्च न्यायालयात बालंट ओढवले असते, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सविस्तर वाचा-विनायक मेटेंच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट- सचिन सावंत - मुंबई - परभणी जिल्ह्याचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या विविध विषयांवर असलेले मतभेद आणि त्यातून आलेल्या नाराजीमुळे आज आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद असतील ते दूर केले जातील, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडीतील इतर नेते यावर मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात दिली.
सविस्तर वाचा-परभणी जिल्ह्यातील सेना-राष्ट्रवादीतील मतभेद दूर केले जातील - एकनाथ शिंद - औरंगाबाद - सरकारने धार्मिक स्थळे सुरु केली नाहीत तर आम्ही करू, असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. सरकारने सर्वच बाबतीत सूट दिली आहे, मग धार्मिक स्थळांना का नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. एक तारखेपासून मंदिर तर दोन तारखेपासून मशिद उघडावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
सविस्तर वाचा-राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडावी, अन्यथा...
- रायगड - महाड इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या पाच आरोपींपैकी आरसीसी सल्लागार बाहुबली धमाणे याला महाड पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली होती. आज धमाणे याला माणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची (30 ऑगस्ट पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. या दुर्घटनेतील मुख्य आरोपी बांधकाम व्यवसायिक फारूक काझीसह तीन जण अद्याप फरार आहेत.
सविस्तर वाचा-महाड इमारत दुर्घटना : आरोपी बाहुबली धमाणेला 5 दिवसांची पोलीस कोठडी
- पुणे- कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राझेनेको आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहभागातून कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यात आली आहे. या लसीची पहिली मानवी चाचणी आज(बुधवारी) पुण्यात पार पडली. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये एका स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा-कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी पुण्यात पडली पार
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा-एमपीएससीच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलल्या; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय