- श्रीनगर -काश्मीर खोऱ्यात लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. हिजबुल कमांडर रियाज नायको या कारवाईत ठार झाला आहे. दरम्यान, अवंतीपोरा येथील चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले असून त्यांच्याकडून एके 56 रायफल जप्त करण्यात आली आहे. तर परिसरातील सुमारे 12 ते 15 घरांमधील नागरीकांना बाहेर काढण्यात आले आहे.
सविस्तर वाचा :काश्मिरात दहशतवाद्यांसोबत चकमक ; हिजबुल कमांडर रियाज ठार
- नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत १५ हजार ५२५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रातील गंभीर होत चाललेल्या परिस्थितीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येऊ शकतात यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.
सविस्तर वाचा :कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक, मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार - केंद्रीय आरोग्य मंत्री
- सोलापूर- आषाढी वारीची शेकडो वर्षांची परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी भूमिका पालखी सोहळा प्रमुखांनी घेतली आहे. शासन जे काही नियम घालून देईल त्या नियमांचे पालन केले जाईल. शासनासोबत चर्चा केल्यानंतरच वारीबद्दलची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितले आहे.
सविस्तर वाचा :शासनासोबत चर्चा करुनच आषाढी वारी - सोहळा प्रमुख
- रत्नागिरी- आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे, रुढी, प्रथा, चालीरीतीविरोधात संघर्ष करून एकत्र आलेले प्रेमीयुगुल आपण चित्रपटांतून नेहमीच बघतो. मात्र, तसाच अनुभव मुंबईतील प्रेमीयुगलांबाबत आला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रेयसीच्या ओढीने मुंबईतील तरुण पोलिसांची नजर चुकवत चक्क पायी प्रवास करत, मिळेल ते वाहन पकडत सिंधुदुर्गात पोहोचल्याचे समोर आले आहे. मात्र, तरुणीला घेऊन परत जाताना रत्नागिरी पोलिसांनी या दोघांनाही पकडून क्वारंटाईन केले आहे.
सविस्तर वाचा :लॉकडाऊन प्रेम- ६०० किमीची पायपीट, तिला परतही आणले, पण.. कोकणातील 'काहे दिया परदेस'
- पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या महामारीमुळे होणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आषाढी वारीची परंपरा अखंडीत ठेवले जाणार आहे. मात्र पालखी सोहळ्याचे स्वरूप शासनाशी चर्चा करुनच ठरवले जाणार असल्याची माहिती, मुख्य विश्वस्त अॅड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.
सविस्तर वाचा :ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अखंडीत सुरू राहणार.. शासनाशी चर्चा करुन ठरवणार धोरण
- रायगड -सर्वांची सर्व विघ्न दुर करणारा गणपती बाप्पा स्वतः कोरोनामुळे संकटात सापडल्याची बातमी 'विघ्नहर्त्यावर कोरोनाचे विघ्न' या मथळ्याखाली ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. ईटीव्ही भारतच्या या बातमीमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाला गणपती उद्योजकांची व्यथा समजली असून शासनाने या सर्व उद्योजकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही गोष्ट शासन दरबारी मांडली. त्यानंतर शासनाने, नियम आणि अटींसह गणेश मूर्ती बनवणारे कारखाने सुरु करण्यास परवाणगी दिली आहे.