- मुंबई - माणुसकीच्या नात्याने मजुरांना मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. मुळातच शिवसेनेचे सरकार कोरोनाशी लढण्यास फेल ठरले असून, खरी परिस्थिती पाहता सोनूवर आरोप करून सरकारचे अपयश लपणार नाही, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली.
सविस्तर वाचा -सोनू सूदवर आरोप करून खरी परिस्थिती लपणार नाही, राम कदमांची संजय राऊतांवर टीका
- रत्नागिरी - निसर्ग चक्रिवादळामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगडमध्ये या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शासनाकडून रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तत्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा -निसर्ग वादळ: रत्नागिरीसाठी 75 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटींची तत्काळ मदत जाहीर
- राजकोट -काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपामध्ये जाणाऱ्या आमदारांना लोकांनी चपलांनी मार दिला पाहिजे, असे मत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केले आहे. गुजरातमध्ये येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पटेल यांनी असे म्हटले आहे.
सविस्तर वाचा -'भाजपामध्ये जाणाऱ्या काँग्रेस आमदारांना लोकांनी चपलेने मारावे"
- नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील खासगी रुग्णालये दिल्लीकरांसाठी राखवी ठेवण्यात येतील, असा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. त्यावरून दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीचा रहिवासी कोण याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सविस्तर वाचा -दिल्लीचा रहिवासी कोण हे स्पष्ट करा...काँग्रेसची मागणी
- नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील मॉल आणि शॉपिंग सेंटर दोन महिन्यांहून अधिक काळानंतर सोमवारपासून पुन्हा उघडली जात आहेत. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन वारंवार निर्जंतुकीकरण, खरेदी दरम्यान गर्दी टाळणे, शारीरिक सुरक्षित अंतर राखण्यावर कटाक्षाने लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा -अनलॉक 1.0 : राजधानी दिल्लीत सोमवारपासून मॉल्स, शॉपिंग सेंटर सुरू होणार
- लंडन - अमेरिकेत पोलिसांच्या कारवाईत ४६ वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आंदोलने असून काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. लंडनमध्येही याविरोधात नागरिकांनी आंदोलन केले. आंदोलनावर नियंत्रण मिळवताना गेल्या काही दिवसांमध्ये 23 पोलीस जखमी झाले आहेत, असे पोलीस अधीक्षक जो. एडवर्ड्स यांनी सांगितले.