- रायगड - रायगडवर आलेले वादळ परतवून लावण्याचे कसब हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी लीलया निभावले आहे, हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे वादळे परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हावासियांचे कौतुक केले आहे. रायगडकरांनी या निसर्ग चक्रीवादळात धीराने तोंड दिले आहे. म्हणून मी रायगड करांचे कौतुक करण्यास आलो आहे, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
सविस्तर वाचा :#Cyclone 'निसर्ग' : वादळ परतवणे हे रायगडकरांना नवीन नाही - मुख्यमंत्री
- मुंबई- राज्य सरकारने विनापरवानगी गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेप्रमाणे राज्य सरकारनेही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी आदेश काढले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा कामाच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
सविस्तर वाचा :...तर गावी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई
- सोलापूर - लाखो वारकऱ्यांचे आराद्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी हे वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
सविस्तर वाचा :विठ्ठल रूक्मिणीच्या मूर्तीला वज्रलेप, आषाढी एकादशीपूर्वी पूर्ण होणार प्रक्रिया
- अमरावती-वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा मात्र महिलांनी पूजा करण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा : 'बाहेर कोरोना आहे... वडाच्या पूजनासाठी महिलांनी घराबाहेर पडू नये'
- औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्याजवळ पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असून उद्यान कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
सविस्तर वाचा :औरंगाबादला वाघाच्या पिंजऱ्यात झोपला तरुण, थोडक्यात वाचला जीव
- मुंबई -शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगावच्या आरे कॉलनीत सध्या काय चाललेय याचा आढावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी जया पेडणेकर यांनी घेतला. लॉकडाऊनमुळे प्रदूषणाला आळा बसला असून वृक्षतोड झोपडपट्टीसाठी वृक्षतोडीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचे समोर आले. याबाबत स्थानिक आदिवासी नागरीक व सेव्ह आरेतील सक्रिय कार्यकर्ते प्रकाश भोईर यांच्याशी ईटीव्ही भारतने बातचीत केली आहे.