- नवी दिल्ली - आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत निर्मला सितारामन यांनी आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत योजनांची घोषणा केली. यावेळी स्थलांतरीत मजूर, मुद्रा लोन, फेरीवाले, आदिवासी आणि लहान शेतकऱ्यांसाठी विविध ९ मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. यासोबतच एक देश एक राशन कार्ड म्हणजेच आधारकार्डद्वारे देशातील कोणत्याही कोपऱ्यात असले तरी राशन कार्ड नागरिकांना मिळणार आहे.
सविस्तर वाचा -आता देशात कोठेही मिळणार रेशनकार्डवर धान्य; स्थलांतरीत मजुरांना २ महिन्यांचे धान्य मोफत
- मुंबई - अखेर विधानपरिषदेच्या 9 जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
सविस्तर वाचा -विधानपरिषद निवडणूक अखेर बिनविरोध, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले आमदार
- हैदराबाद - जीडीपीच्या १० टक्के असलेल्या आत्मनिर्भर पॅकेजची विस्तृत माहिती अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून टप्प्या टप्प्याने देण्यात येत आहे. आज अर्थमंत्र्यांनी स्वावलंबी भारत पॅकेजचा लघू आणि मध्यम उद्योगांना काय फायदा होणार याबाबत माहिती दिली. या माहितीचे विश्लेषण सोप्या शब्दात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी केले आहे.
सविस्तर वाचा -आत्मनिर्भर भारत पॅकेज लघू आणि मध्यम उद्योगांना किती फायदेशीर ठरणार, जाणून घ्या..
- कोल्हापूर - गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातून परराज्यात रेल्वे सोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत 3 रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आम्हाला सुद्धा घेऊन जा म्हणत आज शेकडो मजूर महामार्गावर उतरले. येथील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणारे हे मजूर असून कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या मूळ गावी परत सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सविस्तर वाचा- आम्हाला आमच्या घरी पाठवा, कोल्हापुरात शेकडो मजूर रस्त्यावर
- पुणे - शहरात औषधांची घाऊक खरेदी-विक्री येत्या शुक्रवारपासून तीन दिवस बंद राहणार आहे. बाजारपेठेतील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बाजारपेठेत जवळपास चारशे घाऊक दुकाने असून शहरातील पाच हजार औषध दुकानांना औषध पुरविले जात आहेत. या भागात गेली अनेक वर्षे ही दुकाने चालू आहेत.
सविस्तर वाचा -सदाशिव पेठेतील घाऊक बाजारपेठ उद्यापासून तीन दिवस बंद
- हैदराबाद - जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' या जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. या भागात जाणून घेऊया आयर्लंडमधील कोरोना संक्रमण तसेच शेती आणि त्यावर आधारित व्यवसायांबाबत...