- हैदराबाद - कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी देशभर लागू केलेला लॉकडाऊन घटनाबाह्य असल्याचे खासदार आणि एमआयएम पक्षाने नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाल आहेत. लॉकडाऊनवर तेलगांणाचे मुख्यमंत्री शांत का आहेत? असा सवालही त्यांनी केली आहे.
सविस्तर वाचा -देशभर लॉकडाऊन लागू करणे घटनाबाह्य - असदुद्दीन ओवैसी
- मुंबई - राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील सर्वच कारागृहातून जवळपास 17 हजार कैद्यांना तात्पुरते जामिनावर सोडण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. तसेच 'जेलमधील काही कैद्यांना सोडण्याचा आणि आठ जेलमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे' अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
सविस्तर वाचा -कोरोना इफेक्ट : राज्य सरकार 17 हजार कैद्यांना तात्पुरतं सोडणार
- रत्नागिरी - ठाणे येथून चालत खेड तालुक्यातील वरची हुंबरी या आपल्या गावी येणाऱ्या एका चाकरमान्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदाशिव भिकू कदम (वय 58) असे या चाकरमान्याचे नाव असून महाड तालुक्यातील विन्हेरे जंगलभागात त्यांचा मृत्यू झाला.
सविस्तर वाचा -पोलिसांच्या भीतीपोटी मार्ग बदलला... पायी येणाऱ्या चाकरमान्यावर काळाचा घाला
- मुंबई- विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर उमटला होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर सोमवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे.
सविस्तर वाचा -विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून डमी उमेदवार रमेश कराडांचा अर्ज कायम, तर डॉ. अजित गोपछडेंची माघार
- नवी दिल्ली - प्रकृती खालावल्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी (१० मे) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना आज (मंगळवारी) घरी सोडण्यात आले आहे. ताप, छातीत दुखत असल्याने आणि श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वाचा -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून 'डिस्चार्ज'
- सांगली - विटा तहसीलदार मारहाण प्रकरणी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. वाळू वाहतूक दंड प्रकरणातून चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीलदारांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.