महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 9, 2020, 6:59 AM IST

ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 AM : सकाळी सातच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at seven AM
Top 10 @ 7 AM : सकाळी सातच्या ठळक बातम्या!

  • मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यावर संसर्ग होवू नये, म्हणून अनेक उद्योगधंदे बंद करावे लागले. मात्र, IT क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी घरबसल्या काम म्हणजे 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबलली. मात्र, लॉकडाऊनच्या या काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे अनेक कर्मचाऱ्यांना स्थुलता, लठ्ठपणा, वजन वाढणे यांसारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या सतावू लागल्या आहेत. मात्र, वर्क फ्रॉम होम करतानाही या समस्यांवर उपाय आहेत, असे बालरोगतज्ञ डॉ. हेमंत जोशी म्हणाले. या परिस्थितीत काय उपाय करावेत, यासंदर्भात डॉ. जोशी यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. पाहा, ते काय म्हणतायेत?

सविस्तर वाचा -'वर्क फ्रॉम होम' करताय ना? मग एकदा पाहाच...

  • मुंबई - भारताची चीनसोबत सुरू असलेली चर्चा ही सकारात्मकरित्या पुढे जात असून, आपण ती सुरू ठेवणार असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल जन-संवाद रॅलीमध्ये ते बोलत होते.

सविस्तर वाचा -'सीमाप्रश्नाबाबत चीनसोबत सुरू असलेली चर्चा सकारात्मक'

  • मुंबई - शहरी भागाचा अपवाद वगळता राज्यातील लाखो पालकांकडे चांगले मोबाईल नाहीत, त्यामुळे इंटनेट आणि इतर बाबी दूरच राहतात. अशा वेळी राज्यात ऑनलाईन शिक्षण कसे सुरू करणार, असे अनेक प्रश्न आमदारांनी उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायवाड निरुत्तर झाल्याचे चित्र आज एका बैठकीत समोर आले.

सविस्तर वाचा -'ऑनलाईन' शिक्षण कसे सुरू करणार? आमदारांच्या प्रश्नांपुढे शिक्षणमंत्री झाल्या निरुत्तर..

  • पिंपरी चिंचवड (पुणे) - शहरातील आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत गोंधळ घातला. पोलीस अधिकारी या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस जखमी झाले.

सविस्तर वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये संतप्त नागरिकांची पोलिसांवर दगडफेक; नियम शिथिल करण्याची मागणी

  • मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा या ऑनलाईन सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी दूरदर्शनवर १२ तासांचा स्लॉट देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. मात्र, केंद्राने अद्यापही त्याला दाद दिली नाही. यामुळे नाराज झालेल्या वर्षा गायकवाड यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी साकडे घातले आहे.

सविस्तर वाचा -दूरदर्शनवरील वेळेसाठी शिक्षणमंत्र्यांचे आता मुख्यमंत्र्यांना साकडे..

  • यवतमाळ- खरीप हंगाम सुरू झाला, तरी राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. हा कापूस कधी विकला जाईल याच्या चिंतेत सध्या शेतकरी आहे. त्यामुळेच, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात यावर प्रशासनाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर वाचा -राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरीच; जूनअखेरपर्यंत होणार खरेदी..

  • महाड (रायगड) - तालुक्यातील बावले या गावामधील विलगीकरण केंद्रावर झाड कोसळल्याने एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. जानकीबाई डेरे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामसमितीविरोधात महाड प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा -'निसर्ग'च्या तडाख्यात विलगीकरण केंद्रावर झाड कोसळून वृद्धेचा मृत्यू..

  • पुणे - हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही कामावर येणे एका कमचाऱ्याला चांगलेच महागात पडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

सविस्तर वाचा -'होम क्वारंटाईन'चा शिक्का असताना गेला कामाला; दाखल झाला गुन्हा..

  • नवी दिल्ली -आपले सरकार गरीब आहे, त्यामुळे अधिक पैशांसाठी कर वाढवावा लागत आहे; असे म्हणत चिदंबरम यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत पेट्रोल दरवाढीबाबत आपला रोष व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा -'केंद्र सरकार अन् तेल कंपन्या गरीब; त्यामुळेच जादा करांची गरज..'

  • नवी दिल्ली -देशाच्या राजधानीमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता, भारतीय वैद्यकीय संघटनेच्याच तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीच्या आयटीओमध्ये असणाऱ्या वैद्यकीय संघटनेच्या मुख्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सविस्तर वाचा -भारतीय वैद्यकीय संघटनेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण..

ABOUT THE AUTHOR

...view details