- मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थितीत होते.
सविस्तर वाचा -विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल
- नवी दिल्ली -जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 67 हजार 152 झाला आहे, यात 44 हजार 29 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 20 हजार 916 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 2 हजार 206 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सविस्तर वाचा -INDIA COVID-19 TRACKER : कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ हजारांवर, 2 हजार 206 जण दगावले...
- मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. रविवारी १ हजार २७८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ४ हजार १९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सविस्तर वाचा -MAHA CORONA LIVE : राज्यात आतापर्यंत 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाची लागण; 106 पोलिस अधिकारी, तर 901 पोलिसांचा समावेश
- मुंबई -कोरोनाच्या काळात लढणाऱ्या तब्बल १००७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये १०६ पोलीस अधिकारी असून ९०१ पोलीस कर्मचारी आहेत. अद्यापही ८८७ पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वाचा -चिंताजनक! राज्यात आतापर्यंत १,००७ पोलिसांना कोरोनाची बाधा
- नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निगराणीत ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली. छातीत दुखत असल्याने त्यांना काल(रविवार) एम्स रुग्णालयातील हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग हे ८७ वर्षांचे आहेत.
सविस्तर वाचा -माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर
- मुंबई- मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रोज कोरोनाची लागण झालेले शेकडो रुग्ण आढळून येत असल्याने कंटेनमेंट झोनच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या 2 हजार 646 कंटेनमेंट झोन असून गेल्या 12 ते 13 दिवसात या झोनच्या संख्येत तिप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.