- मुंबई- विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दबाव असतानाही काँग्रेस आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत नाही. महाविकास आघाडीचे 6 उमेदवार असून त्यांना निवडून आणण्याचे नियोजन करत असल्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
सविस्तर वाचा -विधानपरिषदेची निवडणूक होणार, काँग्रेस दुसऱ्या उमेदवारीवर ठाम
- मुंबई -कोरोनाविरोधात पोलीस आणि आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करत आहेत. मात्र, हे करताना त्यांच्या स्वत:चा जीव धोक्यात आहे. राज्य पोलीस दलातील 786 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात 88 पोलीस अधिकारी आणि 698 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा -चिंताजनक...राज्यात 786 पोलिसांना कोरोनाची लागण; 7 जणांचा मृत्यू
- ठाणे- आपल्या गावाला जाण्याकरता शेकडो मजूर पायपीट करत जीवघेणा प्रवास करत आहेत. लोंढेच्या-लोंढे मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघत आहेत. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करुन या मजूरांना परत पाठवले. त्यानंतर रस्त्यावर पोलीस आडवतात म्हणून अनेक मजूर चक्क रात्रीच्या अंधारात नाल्यातून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.
सविस्तर वाचा -गावाची ओढ...पोलीस अडवतात म्हणून परप्रांतीय मजुरांचा चक्क नाल्यातून प्रवास
- हिंगोली- जन्मानंतर 'त्या तिघी' आईपासून दूर गेल्या. तिघींनी एकाच आईच्या पोटी एकाच वेळी जन्म घेतला होता. तिळ्या जन्मल्यामुळे वजन कमी होते. श्वास घ्यायला त्रास होत होता. जन्मानंतर लगेचच त्यांना हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवले. मात्र, तिन्ही मुली झाल्याने त्यांची आई पुन्हा त्यांच्याकडे फिरकलीही नाही. या तिन्ही चिमुकल्यांना परिचारिकांनीच मायेचा ओलावा दिला.
सविस्तर वाचा -'मदर्स डे' स्पेशल..! परिचरिकांनीच दिला 'त्या' तिळ्या चिमुकल्यांना मायेचा ओलावा
- कोल्हापूर - नोकरीमुळे मुंबईत राहत असलेल्या प्रशांत आणि उज्वला कदम यांचा चार वर्षांचा मुलगा समर्थ, शाळेला सुट्टी असल्याने 16 मार्च रोजी कोल्हापुरातील उत्रे गावी आजोबांकडे आला. मात्र, पुढे नेमके काय होणार आहे, याची त्याला आणि घरातील कोणालाही कल्पना नव्हती.
सविस्तर वाचा -Mother's Day : मम्मा लवकर ये.. मला आठवण येतेय! 52 दिवसांपासून मायलेकांची ताटातूट
- धुळे- अमळनेर येथील संभाव्य कोरोनाबाधिताची धुळ्यात कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर हा तरुण पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले. मात्र, या कोरोनाबाधिताने रात्रीच धुळ्याच्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड मधून पळ काढला.