- विशाखापट्टणम -आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील विषारी वायू गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. एका लहान मुलासह नऊ जणांचा यात मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा :विशाखापट्टणम वायू गळती LIVE : मृतांची संख्या पोहोचली ९ वर, आतापर्यंत ८०० लोक रुग्णालयात भरती..
- मुंबई- कोरोना व्हायरसचे संक्रमन थांबविण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
सविस्तर वाचा :चिंताजनक..! राज्यात 531 पोलीसांना कोरोना; 51अधिकाऱ्यांचाही समावेश
- मुंबई - विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते तसेच इतर सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेते यांच्यासोबत आज (गुरुवार) दुपारी २ वाजता मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे. यात राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सविस्तर वाचा :मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीसांसह राज ठाकरेंनाही निमंत्रण
- मुंबई -शहरातील आर्थर रोड कारागृहात 50 वर्षीय कैदी कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या कैद्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची वैद्यकीय चाचणी जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतली. यात काही जेल कर्मचारी, स्वयंपाकी आणि कैद्यांचा समावेश आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या चाचणीच्या अहवालानंतर कारागृहात कोरोना संक्रमण कुठपर्यंत पोहचले आहे, हे स्पष्ट होणार आहे.
सविस्तर वाचा :'त्या' कैद्यामुळे आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची कोरोना चाचणी
- मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, अशातच शिवडी पूर्व येथे एका हातगाडीवर कचराकुंडीत फेकलेला भाजीपाला आणि द्राक्षे विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला. एका सतर्क नागरिकामुळे ही सर्व घटना उघडकीस आली. त्यानंतर संबंधित विक्रेत्याने तो भाजीपाला कचराकुंडीत फेकून दिला.
सविस्तर वाचा :मुंबईत कचराकुंडीतील भाजीपाला विकून नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला प्रकार
- नवी दिल्ली -बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आज कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मोदींनी देशवासियांना बौद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.