महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 8, 2020, 8:52 PM IST

ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या..

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news stories at nine PM
Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या..

  • MAHA CORONA UPDATE : राज्यात आज नवीन 1089 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 19 हजार 63
  • औरंगाबाद- करमाड जवळील रेल्वे अपघातात ठार झालेल्या मजुरांच्या चौकशीसाठी व इतर मदत कार्यासाठी मध्यप्रदेशचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक पथक औरंगाबादेत दुपारी विशेष विमानाने दाखल झाले आहे. अपघातात जखमींची मध्यप्रदेश सरकारच्या मंत्री मीना सिंह यांनी भेट घेतली. घटना दुर्दैवी असून आज रात्री मृतांचे मृतदेह रेल्वेने पाठवण्यात येणार असल्याची माहिती मीना सिंह यांनी दिली.

सविस्तर वाचा -'त्या' मजुरांचे मृतदेह आज रात्री पाठवण्यात येणार - मंत्री मीना सिंग

  • भोपाळ - मध्य प्रदेशात असणाऱ्या शहडोल जिल्ह्यातील एका गावावर शोककळा पसरली आहे. कारण, या एकाच गावातील ११ कामगार आज सकाळी महाराष्ट्राच्या औरंगाबादजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृत पावले होते. रेल्वे रुळांवर झोपलेल्या या कामगारांना भरधाव मालगाडीने चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वाचा -औरंगाबाद दुर्घटना : शाहडोलमधील गावावर पोहोचली शोककळा..

  • मुंबई- मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा कमी करण्यास परदेशी अपयशी ठरल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. परदेशी यांच्या जागी नगर विकास विभागात सचिव असलेल्या इकबाल चहल यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा -मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची उचलबांगडी

  • मुंबई -औरंगाबाद येथे आज (शुक्रवार) सकाळीच एका रेल्वे अपघातात 16 परप्रांतीय मजूरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि स्तलांतरीत मजूर यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातच आता काँग्रस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक ट्वीट करत नव्या मुद्द्याला हात घातला आहे.

सविस्तर वाचा -गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही हे दुर्दैवी : बाळासाहेब थोरात

  • नांदेड - गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्षपर्यंतचे पक्षनिष्ठेचे फळ डॉ. अजित गोपछडे यांना मिळाले. जिल्ह्यातील लिंगायत समाजाची संख्या बऱ्यापैकी असून भारतीय जनता पक्षाने डॉ. गोपछडे यांच्या माध्यमातून लिंगायत समाजाचा ओबीसी चेहरा दिला आहे.

सविस्तर वाचा -पक्षनिष्ठा कामी.. नांदेडमधून डॉ. अजित गोपछडे, भाजपने दिला लिंगायत ओबीसी चेहरा..!

  • औरंगाबाद - करमाडजवळ झालेला अपघात नाही तर हत्या असल्याचा आरोप करत या हत्येसाठी रेल्वे विभागासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली. इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी भेट घेत नांदेडहून आलेल्या अधिकाऱ्यांसमोर रोषव्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा -...ही तर सरकारने केलेली हत्या; नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा - एमआयएम खासदार

  • मुंबई - कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ञगटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ज्ञगटाच्या या अहवालात सूचवण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज चर्चा करण्यात आली.

सविस्तर वाचा -ठप्प अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाचा अहवाल सादर

  • हैदराबाद - जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' या जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे.

सविस्तर वाचा -कोरोनानुभव...'व्यापार वृद्धीपेक्षा झालेले नुकसान भरून काढणे आव्हानात्मक'

  • पुणे -राज्यात विधान परिषदेच्या मोजक्या जागेंसाठी होऊ घातलेल्या निवडणूकीकरिता भारतीय जनता पक्षाने आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना डावलून नवख्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर वाचा -'विधानपरिषदेवर माझा फर्स्ट आणि राईट क्लेम होता, मी निराश झालेय'

ABOUT THE AUTHOR

...view details