- मुंबई - महाराष्ट्रातील महामारीचा वाढता विळखा आणि प्रशासनाचे कार्य याबाबत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील तसेच देशभरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात दोन्ही सरकारांना अपयश आल्याची टीका केली.
सविस्तर वाचा -'ईटीव्ही भारत' विशेष मुलाखत: 'मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी शिवसेना जबाबदार'
- नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये भारतामध्ये 6 हजार 566 कोरोनाबाधित आढळले असून 194 जण कोरोनाचे बळी गेले आहेत.
सविस्तर वाचा -COVID-19 : भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 333
- नवी दिल्ली- भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना गुडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल
- श्रीनगर -जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा हल्ल्याचा कट उधळून लावला. पुलवामाजवळ एका कारमध्ये इंप्रोवाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) ठेवण्यात आले होते. सुरक्षा दलाने वेळीच आयईडी निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वाचा -पुलवामामध्ये टळला मोठा दहशतवादी हल्ला; कारमधून स्फोटके जप्त
- नवी दिल्ली -आज जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा मोठा घातपाचा कट हाणून पाडला. यानंतर मुख्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा -पुलवामा स्फोटक जप्त प्रकरणी डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली माहिती
- मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी आकडेवारी दिली. ती सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. आकडेवारी जर खोटी असेल तर ती तुम्हाला सरकार दरबारी तपासता येईल, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.