- मुंबई- काही जण म्हणतात पॅकेज का नाही दिले? मात्र, आतापर्यंत किती पॅकेज दिली? त्यांचे काय झाले? पॅकेज दिले जाईलच, पण अन्न मिळणे, उपचार मिळणे हे पॅकेजपेक्षाही मोठी गोष्ट आहे, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
सविस्तर वाचा :पॅकेजपेक्षा जनतेला अन्न, आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- नवी दिल्ली -कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेले 300 भारतीय नागरिक लवकरच भारतात परतणार आहेत.
सविस्तर वाचा -पाकिस्तानात अडकलेले 300 भारतीय लवकरच परतणार; महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश
- मुंबई- रमजान ईद सोमवारी साजरा होणार आहे. ईदची सामूहिक नमाज सोशल डिस्टनसिंग पाळून अदा करू द्यावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांकडून होत होती. मात्र, ईदची नमाज घरातच अदा करावी, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
सविस्तर वाचा :रमजान ईदची नमाज घरातच अदा करा, मुस्लीम बांधवांना नवाब मलिकांचे आवाहन
- नवी दिल्ली - सरकारी वीज कंपनीमधील कर्मचारी व अभियंते हे 1 जूनला 'निषेध दिन' पाळणार आहेत. सरकारने वीज कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा निषेध करणार असल्याचे ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनने (एआयपीईएफ) म्हटले आहे.
सविस्तर वाचा :वीज कंपनीतील कर्मचारी 1 जूनला पाळणार 'निषेध दिन'; 'हे' आहे कारण
- रत्नागिरी -जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी लॅब उभारण्यासाठी 1 कोटी 7 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने केला असून लवकरच रत्नागिरीत अत्याधुनिक लॅब सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. येत्या 15 दिवसांत ही लॅब सुरू झाल्यास कोरोना स्वॅब अहवाल रत्नागिरीतच मिळणे शक्य होणार आहे.
सविस्तर वाचा :15 दिवसांत जिल्ह्यात स्वॅब तपासणी लॅब : उदय सामंत
- मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊननंतर आता स्थलांतराचा गंभीर परिणाम अत्यावश्यक अशा औषध वितरण व्यवस्थेवरही होऊ लागला आहे. देशातील 40 टक्के औषधांची गोदामे भिंवडी शहरात आहेत. येथील फार्मा क्षेत्रात काम करणारे 60 ते 70 टक्के मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे येथे सध्या 30 टक्केच व्यवहार सुरू असून मुंबईत औषधे पोहोचायला 10 ते 12 दिवस लागत आहेत.