महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : सायंकाळी चारच्या ठळक बातम्या! - चारच्या ठळक घडामोडी

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at four PM
Top 10 @ 4 PM : सायंकाळी चारच्या ठळक बातम्या!

By

Published : May 19, 2020, 4:09 PM IST

  • हैदराबाद - देशात लॉकडाऊन लागल्यानंतर परराज्यातील स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी आणि प्रवाशांचा मोठा प्रश्न राज्यांसमोर उभा राहीला. या सगळ्यांना आपल्या स्वगृही पाठवण्याची सोय करावी, अशी सातत्यानं मागणी केली जात होती. दरम्यान, राज्याअंतर्गत प्रवासी रेल्वे वाहतूक, मुंबईतील लोकल, रेल्वेचे खासगीकरण आणि अशा अनेक मुद्यावंर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची ईटीव्ही भारतने घेतलेली विशेष मुलाखत.

सविस्तर वाचा - #लॉकडाऊन भारत : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची विशेष मुलाखत

  • हैदराबाद -भारतासह संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत थोड्या उशिराने भारतात आलेल्या कोरानाने 1 लाख कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे.

सविस्तर वाचा -#लॉकडाऊन भारत LIVE : १ लाख रुग्णांचा आकडा गाठण्यात भारत जगात अव्वल

  • मुंबई -कोरोनाचा देशातील वाढता संसर्ग पाहून केंद्र सरकारने चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजूरांनी आपापल्या गावी जाण्याासाठी वांद्रे परिसरातील रेल्वे स्टेशन परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांनी गर्दी करु नका, असे वारंवार आवाहन केले होते.

सविस्तर वाचा -वांद्रे स्थानकात उत्तर भारतीयांची तुफान गर्दी, पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील सकाळी वाहनांच्या रांगा

  • मुंबई - राज्यातील कोरोनासंदर्भातील विविध प्रश्नासंदर्भात राज्यपालांची भेट घेतल्या नंतर भाजपाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.

सविस्तर वाचा -‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन : राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपा शिष्टमंडळ मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; शरद पवार यांचीही घेणार भेट

  • यवतमाळ - जिल्ह्यातील आर्णी जवळील कोळवनगावाजवळ मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीने उभ्या टिप्परला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 4 प्रवासी जागीच ठार झाले तर, 22 गंभीर व्यक्ती जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा -परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीची टिप्परला धडक; 4 ठार, 22 गंभीर

  • मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन आता ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा हा चौथा ट्प्पा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कितपत होते यात शंकाच आहे. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्प्प्यातच अनेक नागरिक आणि मजूर आपल्या घरी निघाले आहेत. भाजपच्या या धोरणावर सामनात जोरदार टीका करण्यात आली.

सविस्तर वाचा -कोरोनाने आणले नवे कलियुग! शिवसेनेचा केंद्राच्या धोरणांवर निशाणा

  • ठाणे- आपल्या पत्नीने केलेल्या पोलिसांकडील तक्रारीमुळे व्यथीत झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. त्यामुळे ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात भूकंप आला आहे.

सविस्तर वाचा -पत्नीच्या छळाला कंटाळून शिवसेनेच्या नगरसेवकाचा 'फेसबुक लाईव्ह' करुन आत्महत्येचा प्रयत्न

  • नवी दिल्ली - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) सहकारी बँकांसह प्रादेशिक ग्रामीण बँकांना २० हजार ५०० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. हा निधी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा -नाबार्डकडून सहकारी बँकांसह प्रादेशिक ग्रामीण बँकांना २०,५०० कोटींचे वाटप

  • हैदराबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात पाच टप्प्यांतील सुमारे २१ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. देशाला आत्मनिर्भर करणे आणि कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यावर देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वाचा -' आत्मनिर्भर' आर्थिक पॅकेजवर 'या' राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा नाराजीचा सूर

  • नवी दिल्ली - टाळेबंदी ४.० मध्ये फ्लिपकार्ट, अमेझॉनसह सर्व ई-कॉमर्स कंपन्यांनी कंटेन्टमेंट झोन वगळता सर्व झोनमध्ये ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यकसह बिगर जीवनावश्यक वस्तुंची ऑनलाईन विक्री करता येणार आहे.

सविस्तर वाचा -टाळेबंदी ४.० : ई-कॉमर्स कंपन्यांकडून सर्व वस्तुंच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details