- मुंबई - कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अभूतपूर्व लॉकडाऊनने साखर उद्योगासमोर निर्माण झालेल्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करत भरीव मदत करावी, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
सविस्तर वाचा -लॉकडाऊनमुळे साखर उद्योगासमोरील संकटातून सावरण्यासाठी केंद्राने भरीव मदत करावी - शरद पवार
- सांगली- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, खरिपासाठी तात्काळ कर्ज द्या, यासह विविध मागण्यांसाठी आज माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करण्यात आले आहे. 'माझ अंगण हेच रणांगण' या आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर शेतकरी प्रश्नावर जोरदार निशाणा साधत, इशारा दिला आहे. आपल्या कुटुंबासह अंगणात उभे राहून खोत यांनी हे आंदोलन केले.
सविस्तर वाचा -तिरडीवर झोपलेल्या सरकारने जागे व्हावे, सदाभाऊ खोतांचा आंदोलनातून सरकारला इशारा
- कोल्हापूर- जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांना मोठे केले. असे असताना 'ते' विविध वक्तव्य करुन राजकारण करत आहेत. कोल्हापूरची जनता कोरोनाच्या काळात मेली का जगली, हे पाहायला सुद्धा 'ते' कोल्हापुरात आले नाहीत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
सविस्तर वाचा -कोल्हापूरची जनता ठीक आहे, का मेली हे पाहायला 'ते' आले नाहीत; मंत्री मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांना टोला
- यवतमाळ- कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रक्त आटवून पिकवलेल्या भाजीपाल्यास सध्या पिकाला उठाव नाही. माल नेण्यासाठी वाहन वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी कोबी, वांगे, बरबटी, काकडी आदी भाजीपाला शेतातच सडला. पिकांची दुर्दशा बघून रुई येथील शेतकऱ्याने उभ्या पिकात चरण्यासाठी जनावरांना सोडून रोटाव्हेटर फिरवले.
सविस्तर वाचा -रक्त आटवून पिकवलेला भाजीपाला संचारबंदीमुळे शेतात सडला; संतप्त शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे
- रायगड - मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा पेण तालुक्यातील जिते गावाजवळ वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावर संबंधित प्रकार घडला असून लॉकडाऊनच्या काळातील ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. मोतीराम जाधव (वय-43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांदिवली येथून श्रीवर्धनकडे हे कुटूंब स्वत:च्या गावाकडे निघाले होते.
सविस्तर वाचा -अखेर तो रस्त्यात कोसळला...लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील तिसरी घटना
- लखनऊ :मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रकचा राज्याच्या बहराइच जिल्ह्यामध्ये अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा भरधाव ट्रक थेट झाडाला जाऊन धडकला. या ट्रकमधून स्थलांतरीत कामगार आपापल्या घरी परत निघाले होते. या अपघातात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून, काही कामगार जखमी झाले आहेत.