- रायपूर - छत्तीसगडमधील रायगढ जिल्ह्यातील तेतला गावामध्ये विषारी वायूगळती झाली आहे. शक्ती पेपर मिलमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना संजीवनी नर्सिंग होम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा :छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती, सात जण गंभीर जखमी
- मुंबई- राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही कोरोनाने थैमान घातले आहे. मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सॅनिटाईझसाठी मंत्रालय 3 दिवस बंद करण्यात आले होते.
सविस्तर वाचा :धक्कादायक...! मंत्रालयातील प्रधान सचिवांना कोरोनाची लागण, इतर सचिवांना केले क्वारंटाईन
- मुंबई -सायन रुग्णालयातील घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे हे गंभीर आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तत्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी याबाबत ट्विट केले आहे.
सविस्तर वाचा :'सायन रुग्णालयातील घटना अत्यंत गंभीर, मुंबईकरांना कोणीच वाली नाही का?'
- मुंबई - सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत? जगासमोर हाच तुमचा सायन पॅटर्न नेणार का? मुख्यमंत्री, पालकमंत्री गरिबांची एवढी क्रूर चेष्टा का करताय? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.
सविस्तर वाचा :'हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा, त्यांची क्रूर चेष्टा करण्याचा, हाच का तो तुमचा सायन पॅटर्न?'
- मुंबई- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते, असा उल्लेख फडणवीस यांनी केला होता.
सविस्तर वाचा :शाहू महाराजांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात येऊ शकत नाही, फडणवीसांची दिलगिरी
- लातेहार(झारखंड)- केंद्रीय राखीव पोलीस दल(सीआरपीएफ) च्या जवानांनी झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील गारु प्रखंड येथील बकुळाबंध जंगलातून नक्षलवाद्यांनी लपवलेले बॉंम्ब जप्त केले. यानंतर ते बॉम्ब सीआरपीएफने निकामी केले आहेत, अशी माहिती समादेशक अनिल कुमार मीना यांनी दिली.
सविस्तर वाचा :नक्षलवाद्यांनी लपवलेले बॉंम्ब जप्त करण्यात सीआरपीएफला यश
- कोलकाता- भारतीय नौदलातील आयएनएस नेताजी सुभाषच्या दोन नाविकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या दोघांमध्येही तापाची लक्षणे दिसली. यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याचे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले.