- चंद्रपूर- जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य नियोजन आणि संरक्षण केल्याने वाघांची संख्या येथे शंभराहून अधिक झाली आहे. वन्यजीव शृंखलेत सर्वोच्चस्थानी असलेला वाघ वाचला तरच पर्यावरण वाचेल हे साधं आणि सोपं गणित आहे. मात्र, एक वेळ अशीही होती जेव्हा ताडोबात वाघांची शिकार केली जायची, अत्यंत अमानुष आणि क्रुर पद्धतीने त्यांना संपविले जायचे. केरळ येथे हत्तीणीचा मृत्यू झाला आणि पुन्हा हा विषय चर्चेला आला.
सविस्तर वाचा :पर्यावरण दिन विशेष: 'हत्तीणीचा जीव गेला.. वाघांना त्यापेक्षा क्रुरतेने मारले जायचे'
- मुंबई -गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबई टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. आज (शुक्रवार)पासून वाहनांच्या वाहतुकीवरील बंधने शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून भायखळा, जेजे उड्डाण पुलाखाली वेगवेगळी दुकाने उघडण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा :रिस्टार्ट मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची गर्दी, दुकानेही उघडली
- हैदराबाद- टाळेबंदी आणि कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारला महसुली उत्पन्नात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने खर्च आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोणत्याही नव्या योजनांची घोषणा करू नका, अशा सूचना वित्त मंत्रालयाने सर्व विभागांच्या मंत्रालयाला दिल्या आहेत.
सविस्तर वाचा :आर्थिक संकट : नव्या योजनांची घोषणा नको; वित्त मंत्रालयाचे आदेश
- रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन यशस्वी झाले आहे. पॅकेज हा शब्द माझ्याकडे नाही. मी थेट मदत देत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली.
सविस्तर वाचा :रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत - मुख्यमंत्री
- पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ परिसराची आज (शुक्रवार) पाहणी केली. या वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. यावेळी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
सविस्तर वाचा :निसर्ग चक्रीवादळ: नुकसानग्रस्त भागाला अजित पवारांची भेट, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश
- औरंगाबाद - एकीकडे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, यासाठी महिला वडाची पुजा करतात. आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र महिला वडाच्या झाडाचे पूजन करत आहेत. मात्र, याचवेळी पत्नीपीडितांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 'ही पत्नी आता नको', अशी भावना व्यक्त केली आहे.