- मुंबई - राज्यात आज १,९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधित ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा -CoronaVirus : राज्यात आज 3 हजाराहून अधिक नवे कोरोना पॉझिटिव्ह, 91 रुग्णांचा मृत्यू
- हैदराबाद :गोऱ्या अमेरिकनांकडून अफ्रिकन अमेरिकनांना रोजच भेदभाव, शोषण आणि छळाला सामोरे जावे लागत असल्याचे मत सध्या अमेरिकेत अफ्रिकन अमेरिकन नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्राची पाटणकर यांनी व्यक्त केले आहे. पाहूयात 'ईटीव्ही भारत'ची ही विशेष मुलाखत...
सविस्तर वाचा -जॉर्ज फ्लॉइड यांच्या हत्येनंतर कृष्णवर्णीयांचा उद्रेक हा उठाव - प्राची पाटणकर
- नवी दिल्ली - माजी राज्यसभा खासदार शाहिद सिद्दीकी यांच्या पुतणीचा उपचार करण्यास दिरंगाई झाल्याने मृत्यू झाला आहे. तिला श्वास घेण्यास अडचण होत असल्याने, तसेच ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वाचा -उपचारास दिरंगाईमुळे माजी खासदाराच्या पुतणीचा मृत्यू; दिल्लीमधील प्रकार..
- श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील रेबन परिसरात शोधमोहीम होती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत 5 जण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर वाचा -जम्मू काश्मिरात सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 5 दहशतवादी ठार
- पुणे -राजकारण करण्यावेळी राजकारण करू आता राजकारण करू नये. फडणवीसांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये, असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना लावला आहे. सोनू सूदने चांगले काम केले आहे. त्यामुळे सोनू सूद असो की इतर कोणी संकटकाळात काम करणाऱ्यांचे अभिनंदनचं आहे. संजय राऊत सोनू सूदबद्दल काय बोलले ते माहीत नाही. मात्र, जो कोणी चांगले काम करेल त्यांच्या माझ्यावतीने अभिनंदनच आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
सविस्तर वाचा -सोनू सूद असो की इतर कोणी चांगले काम करणाऱ्यांचे अभिनंदनचं: गृहमंत्री
- मुंबई - कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमांतून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे? हे केंद्र सरकारने एकदाचे देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.