- नवी दिल्ली- भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राईम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असून त्याला पाकिस्तानमधल्या कराची शहरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माध्यमांमध्ये येत आहे. गुप्तचर विभागानेही यासंबधी माहिती दिली होती. मात्र, दाऊदला कोरोनाची लागण झाली नसल्याचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राईमने आयएनएसशी बोलताना सांगितले.
सविस्तर वाचा :दाऊदला कोरोनाची लागण झाली नाही, भावाने दिली फोनवरून माहिती
- गोंदिया- सरकारकडे धान साठवून ठेवण्यासाठी गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे 2 लाख 25 हजार क्विंटल धान तीन जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर उघड्यावर पडून आहे.
सविस्तर वाचा :नियोजनशून्यता : सरकारचे सव्वा दोन लाख क्विंटल धान उघड्यावर
- मुंबई -अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्यात मतभेद असल्याचे पहायला मिळत आहेत. मात्र, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षांची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. भाजप पक्ष राज्यपालांच्या आडून सरकारची कोंडी करण्याचा डाव खेळत आहे' असा आरोप ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या कायदा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेश माने यांनी केला आहे.
सविस्तर वाचा :'हा तर राज्यपालांच्या आडून सरकारची कोंडी करण्याचा भाजपचा डाव'
- मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात जवळजवळ तीन महिने लॉकडाउन होता. मात्र, आता अंशतः विमान वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरू होत असल्याने मुंबईतही काही जण येत आहेत. मात्र, मुंबईत परतणे अनेकांची डोके दुःखी ठरू शकते. विमान अथवा रेल्वेने मुंबईत परतणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय नियमावली नुसार 14 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य असणार आहे.
सविस्तर वाचा :मुंबईत परतणार आहात, तर जाणून घ्या तुमची कामे रखडणार तर नाहीत ना?
- हिंगोली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने खूप कठोर भूमिका निभावली होती. अद्यापपर्यंत अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त कोणालागी कोठेही जाऊ दिले जात नव्हते. यासाठी ई-पास ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्यांच्याकडे पास असेल त्यालाच प्रवास करण्यास मुभा दिली जात होती. आता नव्याने काढलेल्या आदेशानुसार कुठेही इच्छित स्थळी जाण्यासाठी पासची अजिबात गरज नाही. तरीही संबंधितांनी नियमाचे पालन करण्याची गरज आहे.
सविस्तर वाचा :आता विनापास तुमच्या इच्छित स्थळी जा; मात्र या राहणार अटी
- अमरावती -विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होईल, असा विश्वास शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व आवश्यक संसाधनाचा उपयोग करुन शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण परिषदेच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असेही बच्चू कडू म्हणाले.