महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ १० AM : सकाळी दहा पर्यंतच्या ठळक बातम्या, जाणून घ्या एका क्लिकवर...

सकाळी दहाच्या ठळक बातम्या...

top ten news stories at 10 am
Top १० @ १० AM : सकाळी दहाच्या ठळक बातम्या, जाणून घ्या एका क्लिकवर...

By

Published : Jun 6, 2020, 10:00 AM IST

Updated : Jun 6, 2020, 10:09 AM IST

मुंबई -दरवर्षी होणाऱ्या ’हज यात्रे'वर यंदा कोरोनाचे सावट पसरले आहे. शुक्रवारी (दि. 5 जून) विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच दमदार हजेरी लावली. छत्तीसगडच्या कांकेरजिल्ह्यातील माओवादी प्रभावित सिकसोड पोलीस ठाणे क्षेत्रात पोलिसांच्या शोध पथकाने माओवाद्यांनी लपवून ठेवलेले आयईडी बॉम्बसह अन्य साहित्य हस्तगत केले आहेत. कोरोना आता दिल्ली विधानसभेत पोहोचला आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांचे सचिव कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केल्याबद्दल माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने माफी मागितली आहे. यासह महत्वाच्या टॉप-१० घडामोडी...

  • मुंबई - शुक्रवारी (दि. 5 जून) विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच दमदार हजेरी लावली आहे. सकाळी साडेसहा वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली होती. सकाळी साडे नऊच्या दरम्यान काही ठिकणी पाऊस थांबला आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानी वर्तवली जात आहे.

वाचा सविस्तर -मुंबईत पावसाची दमदार हजेरी, येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र अन मराठवाड्यात पावसाची शक्यता

  • कांकेर (छत्तीसगड) - जिल्ह्यातील माओवादी प्रभावित सिकसोड पोलीस ठाणे क्षेत्रात पोलिसांच्या शोध पथकाने माओवाद्यांनी लपवून ठेवलेले आयईडी बॉम्बसह अन्य साहित्य हस्तगत केले. यात वायर्स, काही औषधे यांचाही समावेश आहे.


वाचा सविस्तर - छत्तीसगड : माओवाद्यांनी पेरलेले दोन आयईडी बॉम्ब हस्तगत, पोलीस दलाचे यश

  • नवी दिल्ली - कोरोना विषाणूचे संक्रमण आता दिल्ली विधानसभेतही पोहोचले आहे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांचे सचिव कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. यानंतर संपूर्ण कार्यालय सील करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर - दिल्ली विधानसभेत कोरोनाची 'एंट्री', अध्यक्षांचे सचिव 'पॉझिटिव्ह'

  • लखनऊ -दरवर्षी होणाऱ्या ’हज यात्रे'वर यंदा कोरोनाचे सावट पसरले आहे. कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ही यात्रा रद्द झाली तर अर्ज केलेल्या सर्वांना पैसे परत केले जाणार आहेत. या बाबतचा निर्णय ‘हज कमिटी ऑफ इंडिया'ने घेतला आहे. तुर्तास हज यात्रेची तयारी थांबलेली आहे. सौदी अरबकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे हज यात्रा रद्द होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.

वाचा सविस्तर - कोरोना इफेक्ट: 'हज यात्रा 2020' रद्द होण्याची दाट शक्यता

  • नागपूर - काटोल येथे वसतीगृह अधीक्षकाने एका 14 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अधीक्षक राजेंद्र काळबंडे (वय 44 वर्षे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा सविस्तर - धक्कादायक..! वसतीगृह अधीक्षकाकडून दिव्यांग अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे. कर्जत जामखेडमध्ये कोरोना कसा आटोक्यात आणला? तसेच राज्यातील तरुणाईसंदर्भात रोहित यांचे विचार काय आहेत? याबाबत रोहित यांनी ईटीव्ही भारतशी मनमोकळेपणाने संवाद साधलाय. पाहा रोहित पवार यांची ही विशेष मुलाखत.

काय म्हणाले रोहित पवार पाहा -कोरोनामुक्तीचा कर्जत जामखेड पॅटर्न, आमदार रोहित पवार यांची विशेष मुलाखत

  • वर्धा- आईने 200 रुपये न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पंजाब कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सर्वेश इंगळे असे 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. रामनगर पोलिसात घटनेची नोंद असून तपास सुरू आहे.

सविस्तर वाचा -धक्कादायक; आईने 200 रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने घेतला गळफास

  • मुंबई- भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलविरोधी जातीवाचक शेरेबाजी केल्याबद्दल माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने माफी मागितली आहे. रोहित शर्माशी 'इन्स्टाग्राम'वर साधलेल्या संवादा दरम्यान युवराजने मस्तीच्या भरात चहलला उद्देशून जातीवाचक शब्द उच्चारले होते. यावर मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका कार्यकर्त्याने युवीविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर युवीने शुक्रवारी आपली बाजू मांडली. माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो, असे युवी म्हणाला.

वाचा सविस्तर काय म्हणाला युवराज - जातीवाचक शेरेबाजी प्रकरण : पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर युवराज म्हणाला...

  • दुबई- आफ्रिकन वंशाचा अमेरिकेचा नागरिक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलीस अत्याचारामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज बुलंद होऊ लागला आहे. वेस्ट इंडीजचे खेळाडू ख्रिस गेल आणि डेरेन सॅमी यांच्यासह अनेक खेळाडूंनी देखील वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला आहे. सॅमीने तर आयसीसीला कृष्णवर्णीय खेळाडूंच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. आता वर्णद्वेषाबाबत आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा काय म्हणाली आयसीसी - वर्णद्वेषाबाबत आयसीसीने व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली प्रतिक्रिया

  • मुंबई- अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. अनेकजण त्याच्या या कामासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही करत आहे. मात्र, काही लोक आता याचा गैरफायदा घेत आहेत. सोनूच्या नावाने कामगारांना घरी पोहोचवण्याचे आमिष देत पैसै उकळण्याचे काम काही लोक करत आहेत. अशांना सोनू सूदने इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा -सोनू सूदच्या नावाने कामगारांची फसवणूक, अभिनेत्याने ट्विटरवरुन दिली माहिती

Last Updated : Jun 6, 2020, 10:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details